आज जागतिक पर्यावरण दिन
महा एमटीबी   05-Jun-2018

जगभरात 'जागतिक पर्यावरण दिना'चे आयोजनसंतुलित आणि प्रदूषणविरहीत पर्यावरणासाठी सुरु करण्यात आलेल्या 'जागतिक पर्यावरण दिना'चे आज देशभरात विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. 'बीट प्लास्टिक' अर्थात 'प्लास्टिक वापर टाळा' ही यंदाच्या 'पर्यावरण दिना'ची संकल्पना असून यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून देशासह जगभरात विविध कार्यक्रमांचे आज आयोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे यंदाच्या पर्यावरण दिनाचे यजमान पद हे भारताकडे आले असून त्यानिमित्त देशात आज वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून त्याऐवजी त्याला पर्याय म्हणून इतर वस्तूंच्या वापर करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. याचबरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी म्हणून देखील नागरिकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे.


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांनी देखील याविषयी नागरिकांना मार्गदर्शन केले असून 'आपल्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे' अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी केले आहे. तसेच विकास आणि पर्यावरण संतुलन हे एकच वेळी साध्य होऊ शकते. परंतु नागरिकांनी त्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
 
 
 


पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन ५ जून १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी पर्यावरण दिनानिमित्त प्रस्ताव मांडला होता. यानंतर १९७४ पासून आजच्या दिवशी जनमानसात पर्यावरण विषयक जागृती निर्माण व्हावी म्हणून 'जागतिक पर्यावरण दिवस' साजरा करण्यात येतो.