श्रीदेवीचा हा सुंदर व्हिडीओ पाहिला काय?
महा एमटीबी   04-Jun-2018
 
 

 
 
बॉलीवूडची हवाहवाई अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचा २ जूनला लग्नाचा २२ वा वाढदिवस होता. मात्र तीन महिन्यांपूर्वी श्रीदेवी यांचे निधन झाले असल्याने २२ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी ती बोनी कपूर यांच्या सोबत नसल्याने हे दुख: व्यक्त करत बोनी कपूर यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर श्रीदेवी यांच्या आठवणींचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या कौटुंबिक आणि त्यांच्या नात्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 
 
 
 
 
 
हा व्हिडिओ पाहून श्रीदेवी या कौटुंबिक आयुष्याची जबाबदारी किती सहजपणे पार पाडत होत्या असे लक्षात येते. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांचे नाते देखील या व्हिडीओच्या माध्यमातून दिसून येते. मुलगी, आई, पत्नी, जेठानी अशा विविध भूमिका त्यांनी पार पाडल्या आहेत. अभिनेता अनिल कपूरसोबत त्यांचे नाते किती सुंदर होते ते देखील या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. तुम्ही देखील हा व्हिडीओ जरूर पहा....