मलेशिया खुली बॅटमिंटन स्पर्धा : सिंधू आणि श्रीकांत यांची मजल
महा एमटीबी   30-Jun-2018
 
 
 
 
मलेशिया : मलेशिया येथे सुरु असलेल्या खुल्या बॅटमिंटन स्पर्धेमध्ये भारताचे स्टार बॅटमिंटनपटू पी.व्ही.सिंधू आणि श्रीकांत किदंबी यांनी मजल मारली आहे. या स्पर्धेमध्ये दोघांनी आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन केले आहे. महिला एकल वर्गामध्ये रिओ ऑलिंपिक रजत पदक विजेती पी.व्ही.सिंधू हिने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. 
 
 
 
तर पुरुष एकल वर्गामध्ये श्रीकांत किदंबी याने अंतिम चारमध्ये आपली जागा सुनिश्चित केली आहे. दोघांनी अतिशय अतितटीच्या सामन्यात हा विजय मिळविला आहे. पी.व्ही. सिंधू हिने हा सामना जिंकला तर ती या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारेल. जर हा सामना सिंधू जिंकली तर मलेशिया खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली महिला बॅटमिंटनपटू ठरेल. 
 
 
 
जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेली ताई त्झू यिंग हिच्यासोबत सिंधू आता उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. स्पेनची कॅरोलिना मरिन हिला उपांत्यपूर्व फेरीत मागे टाकून तिने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.