"नगर मे ढिंढाेरा पिटवादाे, वाे लाैट आया है"
महा एमटीबी   27-Jun-2018


 
बाहुबली नंतर बाहुबली २ चित्रपट प्रदर्शित होऊनही एक वर्ष उलटून गेलं. पण अजून बाहुबलीची क्रेझ काही कमी होताना दिसत नाहीये. कोणत्या ना कोणत्या रूपाने 'बाहुबली'ची चर्चा होते. आता हेच बघा ना मराठी प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशींचा चेहरा चक्क बाहुबलीला लावून एक फोटो इतक्या सफाईदार पद्धतीने एडिट करण्यात आला आहे आणि तो त्यात चपखलही बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हा फोटो बराच व्हायरल होताना दिसतोय. याचा अधिक शोध घेतल्यावर असं लक्षात आलं की स्वप्नील जोशींचा चाहता दानिश शेख याने हा फोटो एडिट केला असून तो फोटो ट्विटरवर प्रसिद्ध झाल्यानंतर स्वप्नीलनेही त्यावर 'वन ऑफ दि बेस्ट एडिट' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
 
 
 

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पोस्ट मध्ये 'मेरा वचन ही मेरा शासन है. '' "नगर मे ढिंढाेरा पिटवादाे, वाे लाैट आया है" हे बाहुबली २ मधील लोकप्रिय झालेले संवाद टाकण्यात आले आहेत. स्वप्नीलच्या चाहत्यांचे त्याच्यावर एवढे प्रेम आहे की त्या ग्रुपने पुण्यात एकत्र येऊन एडिट केलेल्या या फोटोचा केक कापण्याचा विशेष कार्यक्रमही नुकताच घेतला होता.
 
 
 
यापूर्वी बाहुबलीचे पहिले पोस्टरही गेल्या वर्षी सोशल मीडियावर फिरत होते. ते देखील दानिश यानेच केले होते.