मराठी झिंगाट पाहिला आता हिंदी देखील पहा....
महा एमटीबी   27-Jun-2018
 
 
 
 
 
मराठीतील ‘झिंगाट’ या गाण्याने सगळ्यांना वेड लावले होते. आता हिंदी ‘झिंगाट’ गाणे देखील प्रेक्षकांना वेड लावायला आले आहे. ‘धडक’ या चित्रपटातील हिंदी ‘झिंगाट’ गाणे आज प्रदर्शित करण्यात आले आहे. दिग्दर्शक करण जोहर याने हे गाणे आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केले आहे. अभिनेत्री जानव्ही कपूर आणि अभिनेता ईशान खट्टर यांनी या गाण्यामध्ये चांगलीच धम्माल केली आहे.
 
 
 
 
 
मराठी सैराट चित्रपटातील जसे ‘झिंगाट’ गाणे आहे त्याचसारखे हिंदी ‘झिंगाट’ गाणे आहे. फक्त हिंदी चित्रपटात नेहमीसारखा दिखावा आणि अभिनेता आणि अभिनेत्री वेगळे दाखवण्यात आले आहे. या गाण्यात देखील नृत्य जसेच्या तसेच करण्यात आले आहे. मात्र मराठी ‘झिंगाट’ प्रमाणे हिंदी ‘झिंगाट’ला जास्त सर येतांना दिसत नाही. 
 
 
 
 
तरी देखील दोन्ही गाण्यांना पाहता दोघांचे संगीत सारखेच आहे. फक्त गाण्यातील बोल हे हिंदी आहेत. त्यामुळे गाणे लागले की मराठी ‘झिंगाट’ सुरु झाला असेच वाटते. मात्र गाण्याचे बोल कानावर पडल्यावर हिंदी की मराठी हे समजण्यास मार्ग मिळतो.