मी 'ठुमकेवाली' नाही एक कलाकार आहे : सपना चौधरी
महा एमटीबी   26-Jun-2018

 
 
हरियाणा :  "मी ठुमकेवाली नाही एक कलाकार आहे, ज्याचे विचार जसे असतात त्याला समोरची व्यक्ती तशीच दिसते, खासदार अश्विनी कुमार चोप्रा वयाने मोठे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून माफीची अपेक्षा नाही. मी एक कलाकार आहे, आणि माझे काम उत्तम करणे मला येते." अशा शब्दात कलाकार सपना चौधरी हिने खासदार चोप्रा यांच्या विधानावर सडेतोड टीका केली.
 
काँग्रेसला निवडणुकी लढवण्यापेक्षा ठुमक्यांमध्येच जास्त रस आहे, असे म्हणत भाजपचे खासदार चोप्रा यांनी सपना चौधरी हिचा ठुमकेवाली म्हणून उल्लेख केला होता, त्यानंतर याविषयी वाद निर्माण झाला. यावर "माझे लक्ष्य माझ्या कामावर केंद्रित आहे." असा शब्दात सपना ने उत्तर दिले आहे.
 
सपना चौधरी हिला बिग बॉस या रिअॅलिटी शो मधून प्रसिद्धी मिळाली. विविध सिनेमांमधून आणि हायप्रोफाइल पार्ट्यांमधून सपना आपली नृत्यकला सादर करते, मात्र कलेविषयी अशी टिप्पणी केल्यामुळे खासदार चोप्रा अडचणीत आले आहेत.