इस्टाग्राम युट्युबला टक्कर देणार काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
व्हिडीओच्या दुनियेत सध्या युट्युबचा मोठा दबदबा आहे हाच दबदबा जरासा कमी करण्यासाठी आता इस्टाग्राम आपल्या युजर्ससाठी काही नव्या गोष्टी घेवून येत आहे. संपूर्ण जगात व्हिडीओसाठी युट्युबचा वापर केला जातो मात्र आता युट्युबला टक्कर देण्यासाठी इस्टाग्राम व्हिडीओच्या जगात प्रवेश करणार आहे. ‘आयजीटीव्ही’ नावाची नवीन सर्विस इस्टाग्राम आपल्या युजर्ससाठी घेवून येत आहे. याला ‘इस्टा टि.व्ही.’ याच्या नावाने ओळखले जाणार आहे. 
 
 
 
 
यामाध्यमातून आपला दृश्य वर्ग वाढवण्याचा प्रयत्न इस्टाग्राम करणार आहे. सध्या सोशल मीडियामध्ये इस्टाग्राम याचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे. सिनेसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री सध्या इस्टाग्रामवर खूपच सक्रीय असतात त्यामुळे इस्टाग्रामचा वापर आता व्हिडीओ पाहण्यासाठी देखील केला जाणार आहे. आजच्या जगात काय नवीन सुरु आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडीओमधून केला जाणार आहे. 
 
 
 
इस्टाग्रामचे सीईओ केविन सायट्रोम याने ही माहिती दिली असून सोशल मीडियावर व्हिडिओ बनविणारी लेले पोंस हिने याचे स्पष्टीकरण दिले आहे. एका फोटोपेक्षा व्हिडीओ जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे जर इस्टाग्रामवर व्हिडिओ हे नवीन ‘फिचर’ लोकांना दिलं तर इस्टाग्रामचा वापर अजून मोठ्या प्रमाणात होईल आणि भविष्यात इस्टाग्राम युट्युबला टक्कर देईल असे सांगण्यात येत आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@