रत्नाकर मतकरी यांना साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |

 
 
गुवाहाटी : ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार २०१८ जाहीर झाला आहे. तर साहित्यिक नवनाथ गोरे यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. साहित्य अकादमीतर्फे आज या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
 
 
 
दरवर्षीप्रमाणे यंदाही साहित्य अकादमीने २२ भाषांमधील पुरस्कारांची आज घोषणा केली. यामध्ये युवा साहित्य पुरस्कारासाठी १० काव्यसंग्रह, ७ लघुकथा संग्रह, ३ कादंबऱ्या आणि एका नाटकाचा समावेश आहे. तर बाल साहित्य पुरस्कारासाठी २३ लेखकांची निवड करण्यात आली आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली गुवाहाटी येथे पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असे साहित्य अकादमीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 
 
 
बाल साहित्य पुरस्कारासाठी ज्येष्ठ मराठी साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कारकिर्दीसाठी तसेच या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे. बाल साहित्य पुरस्कारासाठी मराठी भाषेकरिता डॉ. अनिल अवचट, बाबा भांड आणि डॉ. वसंत पाटणकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर युवा साहित्य पुरस्कारासाठी साहित्यिक नवनाथ गोरे यांच्या फेसाटी या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. युवा साहित्य पुरस्कारासाठी मराठी भाषेकरिता आर. आर. बोराडे, सतीश आळेकर आणि वसंत आबाजी डहाके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. येत्या १४ नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे आयोजित एका विशेष समारोहात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. ५० हजार रुपये रोख, ताम्रपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@