पाशा पटेल यांना ‘देशभक्त बाळासाहेब भारदे स्मृती’ पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |



 

मुंबई: शेतकरी नेते तथा महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना पुणे येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा देशभक्त बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे . दिनांक २७ जून रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथे या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे .
 
 

पाशा पटेल यांनी आतापर्यंत कायमच शेतकर्‍यांसाठी काम केले आहे .शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी स्व . शरद जोशी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत . आताही भाजपाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत .जगाचा पोशिंदा असणार्‍या शेतकर्‍यांच्या न्याय हक्कांसाठी विविध योजना राबविण्यासाठी त्यांचा आग्रह असतो . कृषी विकास तसेच सामाजिक न्याय व्यवस्थेसाठी त्यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे . शेतकरी समाज जागृतीसाठी त्यांनी आजपर्यंत परिश्रम घेतले आहेत . या अतुलनीय योगदानाबद्दल तसेच समाजप्रबोधन क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पद्मभूषण बाळासाहेब भारदे प्रतिष्ठानच्या वतीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

 
 

दिनांक २७ जून रोजी सायंकाळी ५ .३० वाजता पुणे येथील पत्रकार भवनात हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे .सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेत होणार्‍या या कार्यक्रमास त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ . डी .वाय .पाटील , माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .भारदे प्रतिष्ठानचा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पाशा पटेल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

@@AUTHORINFO_V1@@