मुन्नाभाई पुन्हा एकदा येतोये 'जादू की झप्पी' द्यायला
महा एमटीबी   22-Jun-2018
 

 
 
 
मुंबई : मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप मन जिंकले आता पुन्हा एकदा ‘जादू की झप्पी’ द्यायला मुन्नाभाई तुमच्यासमोर येतोये मात्र मुन्नाभाई तिसऱ्या चित्रपटात नाही तर ‘संजू’ या चित्रपटातून मुन्नाभाई तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे. मात्र यात अभिनेता संजय दत्त हा दिसणार नसून अभिनेता रणबीर कपूर प्रेक्षकांना ‘जादू की झप्पी’ देणार आहे. 
 
 
 
 
 
रणबीर कपूरचा आगामी चित्रपट संजू यामध्ये त्याने हुबेहूब संजय दत्तच्या जीवनातील भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला असून हा प्रयत्न त्याचा सफल देखील झाला आहे. आता संजय दत्त म्हटल्यावर मुन्नाभाई हे पात्र विसरून कसे काय चालणार संजू या चित्रपटात मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील एक दृश्य दाखवण्यात आले आहे आणि या दृश्यामध्ये रणबीर हा हुबेहूब संजय दत्त सारखा बोलतो आणि दिसतो आहे त्यामुळे प्रेक्षक देखील हे दृश्य पाहून चकित झाले आहे. 
 
 
 
 
संजू हा चित्रपट संजय दत्त याच्या जीवनावर आधारित असून यात रणबीर कपूर याने अतिशय साजेसा अभिनय देखील साकारला आहे असे ट्रेलर आणि टीझरवरून दिसून येते. आता या चित्रपटातील अजून एक दृश्य प्रदर्शित करण्यात आले असून यात देखील रणबीर अगदी संजय दत्त सारखा दिसत असून मुन्नाभाईच्या वेशात तो भाईच दिसत आहे तुम्ही देखील पहा...