अभाविप मालेगाव जिल्हा संयोजकपदी ईश्वर आहेर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |




नाशिक : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मालेगाव जिल्हा नियोजन बैठक, ज्ञानकुटी, १२ बंगला मालेगाव कार्यालय येथे होऊन मालेगाव जिल्हा संयोजकपदी ईश्वर आहेर याचं निवड करण्यात आली. यावेळी आगामी कार्यक्रमाची विस्तृत योजना व विशेष योजनांची मांडणी करण्यात आली. प्रवास योजना, सदस्यता योजना, महाविद्यालय संपर्क अभियान, ९ जुलै विद्यार्थी दिन, गुरुपौर्णिमा या सर्व विषयांची सविस्तर चर्चा व आगामी योजना करण्यात आली. तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीत पारित झालेल्या शैक्षणिक, सामाजिक सद्यथिती व कृषि शिक्षण प्रस्तावांवर चर्चा घेण्यात आली.

 

जिल्हा समिती जाहीर

 

जिल्हा समितीची घोषणा महाराष्ट्र प्रांत विकासार्थ विद्यार्थी निमंत्रक इशान गनपुले यांनी केली. त्यात जिल्हा समिती, जिल्हा संयोजक ईश्वर आहेर, जिल्हा सहसंयोजक संजय चौरे, जिल्हा कार्यालय मंत्री विशाल आहेर, जिल्हा समिती सदस्य, तेजस जाधव, कामेश गायकवाड, शुभम शर्मा यांची निवड करण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@