सुबोध भावे याचे येणारे चार चित्रपट माहित आहे काय?
महा एमटीबी   22-Jun-2018
 
 
 
 
अभिनेता आणि दिग्दर्शक सुबोध भावे याचे आगामी चित्रपट तुम्हाला माहित आहे काय? सुबोध भावे येत्या वर्षी चक्क चार चित्रपटांमध्ये झळकणार आहे. कट्यार काळजात घुसली या नामवंत आणि प्रसिद्ध चित्रपटाचा दिग्दर्शक सुबोध भावे सध्या मराठी चित्रपट सृष्टीत आवडता अभिनेता मानला जातो. त्यामुळे त्याला सध्या खूप काम देखील मिळत असून त्याचा चाहता वर्ग देखील वाढला आहे. 
 
 
 
 
सुबोध भावे याचा आगामी चित्रपट ‘सविता दामोदर परांजपे’ हा असून या चित्रपटाचे ‘प्रोडक्शन जॉन अब्राहम’ याने केले आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना देखील बॉलीवूडकर आता पसंती द्यायला लागले आहेत. सुबोध भावे याचा दुसरा चित्रपट ‘शुभ लग्न सावधान’ हा असणार आहे. सध्या ‘पुष्पक विमान’ या मराठी चित्रपटाचे टीझर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात आजोबा आणि नातू यांच्या नात्याची कथा सांगण्यात आली आहे. 
 
 
 
 

 
 
 
पुष्पक विमान, ...आणि काशिनाथ घाणेकर, शुभ लग्न सावधान, सविता दामोदर परांजपे अशा चार नव्या चित्रपटांमधून सुबोध भावे पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला लवकरच येणार आहे. या सगळ्याच चित्रपटांची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. काशिनाथ घाणेकर आणि  सविता दामोदर परांजपे हे दोन चित्रपट सामाजिक वसा जपणारे असल्याने या चित्रपटांची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.