बालरोगतज्ज्ञांची आजपासून विभागीय परिषद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |



 

नाशिक : आधुनिक व प्रगत उपचार पद्धतीवर विचारमंथन व ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी बालरोगतज्ज्ञांची राष्ट्रीय संघटना इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सतर्फे येत्या २३ व २४ जून रोजी नाशिकमध्ये विभागीय परिषद, ’नाशिकॉन २०१८’ होत असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. जयंत रणदिवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

या परिषदेचे हे चौथे वर्ष असून सुमारे ५०० हून अधिक बालरोगतज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नामवंत तज्ज्ञ नाशिकमध्ये येणार असून ते उपस्थितांना महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत सुरवसे यांनी दिली. या तज्ज्ञांमध्ये लहान बाळाच्या अतिदक्षता आजाराच्या तज्ज्ञ डॉ. सोनू उदानी (मुंबई), नवजात शिशुतज्ज्ञ डॉ. उमेश वैद्य (पुणे), मेडिको लिगल विषयावरील ख्यातनाम तज्ज्ञ अॅनड. डॉ. गोपीनाथ शेनॉय (मुंबई), लसीकरण विषयावरील तज्ज्ञ डॉ. विपिन वशिष्ठ (बिजनोर, उत्तर प्रदेश) यांचा प्रामुख्याने समावेश आहे. संयोजक समितीचे सचिव डॉ. अमोल पवार म्हणाले की, “अनेक नव्या व वेगळ्या विषयांचा यावेळी समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महागड्या वैद्यकीय सेवा स्वस्त करण्यासाठी स्वदेशी निर्मित मशीनच्या वापरावर प्रबोधन, ग्रामीण भागातील कुपोषण व शहरी भागातील मुलांसाठी मोबाईल, व्हिडिओ गेम्स, खाद्य सवयी यांचा मुलांच्या मानसिक व शारीरिक विकासावर परिणाम, पौगंडावस्थेतील मुलांसाठी शरीर व स्वभावातील बदल व उपचार, संसर्गजन्य आजार जसे डेंग्यूसाठी प्रगत उपचार व अपस्मारावरील नवीन औषधी व उपचारपद्धती यांचा समावेश आहे. परिषदेचे उद्घाटन इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. केदार मालवतकर यांच्या हस्ते होणारआहे. परिषदेच्या यशस्वितेसाठी डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ. प्रविण भांबरी, डॉ. प्रशांत कुटे, डॉ. रवींद्र सोनवणे, डॉ. आनंद माखरिया, डॉ. मोहन वारके, डॉ. प्रकल्प पाटील आदी परिश्रम घेत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@