आणि अटलबिहारी वाजपेयीं भेटले मनमोहन सिंह यांना..
महा एमटीबी   22-Jun-2018

 
 
मुंबई :  फोटो बघून आपल्याला नक्कीच वाटले असणार या फोटोमध्ये काय खास आहे? तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आजारी असताना त्यांनी मनमोहनसिंह यांची भेट कशी काय घेतली? तर उत्तर आहे हे खरे अटलबिहारी वाजपेयी नसून राम अवतार भारद्वाज आहेत. अनुपम खेर यांच्यासह "द अॅक्सिडेंटल प्राइममिनिस्टर" या चित्रपटात ते अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहेत.
 
 
 
 
 
अनुपम खेर यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून हा फोटो शेअर करत ही बातमी दिली आहे. अभिनेत्री दिव्या सेठ शहा या चित्रपटात मनमोहन सिंह यांच्या पत्नी गुरशरण कौर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय बारू यांनी लिहिलेल्या 'द अॅक्सिडेंटल प्राइममिनिस्टर' या पुस्तकावर आधारित चित्रपट आगामी काळात प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय रत्नाकर गुट्टे यांनी केलं आहे, तर यामध्ये मुख्य भूमिकेत अनुपम खेर दिसणार आहेत.
 
 
 
 
 
२१ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असून या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांचा 'लुक' खऱ्या पात्रांशी जुळतो. त्यामुळे हा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक विशेष उत्सुक आहेत. अक्षय खन्ना हे संजय बारू यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.