तामिळनाडूचीअनुकृती वास ठरली यंदाची 'मिस इंडिया'
महा एमटीबी   20-Jun-2018

 
 
 
मुंबई : जगभरात प्रसिद्ध असलेल्या फेमिना मिस इंडिया २०१८ ची अंतिम फेरी काल मुंबईत पार पडली. यामध्ये यंदाच्या फेमिना मिस इंडिया २०१८ च्या जेतेपदावर तामिळनाडूच्या अनुकृती वासने आपले नाव कोरले आहे. २९ स्पर्धकांना मात देत तिने हे जेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेत हरियाणाची मिनाक्षी चौधरी प्रथम उपविजेती तर आंध्रप्रदेशची श्रेया राव ही दुसरी उपविजेती ठरली आहे.
 
 
 
 
मुंबई येथे काल पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकारांनी देखील सहभाग घेतला. यामध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित, करीना कपूर खान, जॅकलीन फर्नांडिस यांनी आपले नृत्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्र संचालक प्रसिद्ध दिग्दर्शक करण जौहर आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांनी केलं.
 
 
 
 
 
 
अनुकृती विषयी थोडी माहिती :

अनुकृती वास तमिळनाडूतील रहिवासी आहे. अनुकृती खेळाडू आणि नृत्यांगना देखील आहे. सध्या ती फ्रेंच भाषेतून बीए करत आहे. अनुकृती वासला बाईक चालवण्याचा छंद आहे. भविष्यात सुपर मॉडल बनण्याची तिची महत्वाकांक्षा आहे.