माध्यम शिक्षण दशा,दिशा आणि भवितव्य -
महा एमटीबी   02-Jun-2018व्यावसायिकरणामुळे माध्यम शिक्षणात आमूलाग्र बदल झाले. दुसरा मुद्दा म्हणजे माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या बदलामुळे एकूणच माध्यम उद्योगाने कात टाकली

माध्यम क्षेत्राचा विचार करीत असताना माध्यम बदलांचा आढावा घेणे आवश्यक आहे. गेल्या तीन दशकांमध्ये भारतातील माध्यमांमध्ये आमूलाग्र झालेला बदल आपल्याला दिसून येतो. अनेक बहुराष्ट्रीय माध्यम कंपन्या व्यवसायासाठी भारतात आल्या तसेच अनेक नवनवीन माध्यम भारतात सुरू झाली व भारतामध्ये असणार्या माध्यमांचे पूर्णतः व्यावसायिकरण झाले असं आपण म्हणू शकतो आणि त्या आणि यामुळे काही जुनी माध्यमं नव्याने उभी राहिली, काही माध्यमांचा अस्त झाला, तर नवमाध्यमे अस्तित्वात आली. या माध्यम क्षेत्राच्या बदलाप्रमाणेच आपल्याला माध्यम शिक्षणाचा विचार करावा लागतो. ज्याप्रमाणे बदल माध्यम क्षेत्रात झाले, तसेच माध्यम शिक्षणातही गेल्या तीन दशकात बदल झाले. माध्यम उद्योग हा आता एक ‘उद्योग’ म्हणून स्थापित झाला आहे आणि त्यामुळे आणि त्याच्या काही मागण्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न माध्यम शिक्षण देताना बर्‍यापैकी केला जातो. मात्र, माध्यम क्षेत्रातील सातत्याच्या बदलाबरोबर माध्यम शिक्षण जुळलेले राहत नाही हे खेदाने नमूद करावे लागते. मुळात माध्यमांचे शिक्षण हे औपचारिकपणे किंवा डिग्रीप्रमाणे देणं प्रचंड अवघड आहे. त्यामुळे माध्यम शिक्षण कॅम्पसमध्ये शिकवणं जवळजवळ अशक्य आहे आणि असा प्रयत्न ज्यावेळी केला जातो, तेव्हा त्या शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट होतात. यात आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिक्षणाचंसुद्धा व्यावसायिकरण झालेलं आहे. त्यामुळे माध्यमक्षेत्रातील संधीचा किंवा येथील आकर्षणाचा फायदा घेऊन, मोठे महाविद्यालय, माध्यम संस्था किंवा शिक्षण संस्था या नावावर असंख्य पैसे लुबाडतात असं आपल्याला दिसून येतं. माध्यम पद्धतीचे शिक्षण देण्यात वेगवेगळ्या संस्था आपल्याला दिसतात.

. वेगवेगळ्या राज्यात असणार्‍या विद्यापीठात असणारे अभ्यासक्रम यावर ते चालविले जातात आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमाचा अभ्यास पूर्ण करता येतो

. काही खासगी माध्यमातून हा कोर्स चालविला जातो आणि अशा ठिकाणी माध्यमक्षेत्रात कार्यरत असणारे किंवा पूर्व कार्यरत असणार्‍या व्यक्ती शिकवताना दिसतात. त्यानंतर खाजगी महाविद्यालय याद्वारेदेखील हे चालविले जाते आजकाल self-financed कोर्सेस सुरु झालेले आहेत आणि त्यात हा कोर्स दिसून येतो. ज्यावेळी आपण या कोर्सचा विचार करतो तेव्हा भारतीय विद्याभवन, चखढ यांचा समावेश होतो किंवा बंगळुरुमधील ‘एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझम’ आहे. मुंबईमध्ये ‘गोएंका इंस्टिट्यूट’ आहे अशी बरीच ठिकाण आपल्याला दिसतात. याखेरीज काही खाजगी महाविद्यालय किंवा संस्थांनी इतर किंवा विदेशातील माध्यमांशी करार केलेला दिसतो आणि मग कोलंबिया विद्यापीठ, नॉर्थ विद्यापीठ, फ्लोरिडा विद्यापीठ अशा नामांकित विद्यापीठांशी करार करून, काही कोर्स चालविले जातात आणि मग त्यांना सरावासाठी ऑडिओ/व्हिडिओ लॅब, रेडिओ रूम, बातम्या देण्यासाठी रूम, स्वतःचे वृत्तपत्र छापण्यासाठीच्या पद्धती हे सर्व शिकविले जाते. तीन महिन्यापासून ते एक वर्ष, दोन वर्ष असा हा कोर्स असतो. काही मोठ्या माध्यम समूहांनी स्वतःचा असा डोलारा उभारला आहे ‘इंडियन एक्सप्रेस’, ‘इनाडू’, ’जागरण’, ‘पायोनियर’, ‘आज तक’ इ. नामांकित माध्यमांनी स्वतःच्या संस्था उभारल्या असून, यातून शिक्षण दिले जाते. ‘एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझम’, पुण्यातील 'FTII', दिल्लीतील ’IMC (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन) हे केंद्र सरकारतर्फे चालविले जाते तर येथूनही हे शिक्षण दिले जाते. काही पदव्युत्तर, काही पदव्युत्तर डिप्लोमा तर काही प्रमाणपत्र असं या अभ्याक्रमांचं स्वरूप आहे. मुळात यात समस्या कुठे येते तर माध्यम उद्योगातील बदलांशी जुळवून घेणं थोडं कठीण जातं किंवा येथे येणारे माध्यम क्षेत्रातील मातब्बर मंडळीही पैसे कमी मिळतात म्हणून येत नाही किंवा जर आली, तर स्वतःची बढाई करतात आणि मूलभूत शिक्षणापासून दूर राहतात यासाठी लागणारी साधनसामुग्रीही संस्थांकडून मिळत नाही किंवा त्यांच्याद्वारे जुळवून घेतली जात नाही. कॅम्पस प्लेसमेंटही कमी प्रमाणावर होताना दिसते तीदेखील एक समस्या आहे, वेगवेगळे इंटर्नशिप कार्यक्रम यात कमतरता दिसून येते, माध्यम शिक्षण देणारे शिक्षक व त्यांचा इच्छाशक्तीचा अभाव किंवा विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा अभाव यामुळे माध्यम क्षेत्रात दरी निर्माण झाली आहे. शिवाय मागणीपेक्षा पुरवठा जास्त अशी परिस्थिती झाली आहे. मुंबईचा विचार केला तर दरवर्षी साडेचार हजार विद्यार्थी बीएमएम करणारे असून, ते बेरोजगार आहेत असं एकूण माध्यम शिक्षण आणि माध्यम व्यवसाय याबद्दल आपल्याला सांगता येईल.

-गजेंद्र देवडा