तुरुंगातील महिलांशी कसे वागावे यासाठी बनणार नियम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : तुरुंगातील महिलांशी कसे वागावे यासाठी बऱ्याच तुरुंगात काही महत्वाचे नियम असतात मात्र ते नियम पाळले जात नाही आता मात्र सरकारकडून यासाठी नवे नियम तयार केले जाणार आहेत. महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या योजनेने आता ‘लॉ युनिव्हर्सिटी’ हे नियम तयार करणार आहे. 
 
 
 
 
महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या सांगण्यानुसार देशातील कायदा विद्यापीठ यासाठी नवीन नियम तयार करणार आहे. महिलांच्या आरोग्याची आणि खाण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र या सगळ्या बाबी तुरुंगात पाळल्या जात नाहीत. स्वच्छता, आरोग्य आणि महिलांचा विकास व्हावा यासाठी त्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा यांची पाहणी तुरुंगात केली जात नाही. 
 
 
 
 
त्यामुळे जर यासाठी नियम लागू केले तर तुरुंगात आपोआपच हे नियम लागू होतील आणि महिलांना यामुळे तुरुंगात चांगले जीवन जगायला मिळेल. यामुळे महिलांच्या विचारांमध्ये सुधार देखील होईल आणि त्यांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली जाईल. असा दृष्टीकोन यामागे असल्याने यासाठी नवे नियम सरकार तयार करत आहे. सध्या तुरुंगात महिलांना चांगल्या सोयीसुविधा दिल्या जात नसल्याने देखील हे नियम करावे असे सरकारने ठरवले. 
 
@@AUTHORINFO_V1@@