बिहारमधील मुस्लिम म्हणतायेत, 'हम पाकिस्तानी मुजाहिदीन'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |

ईदच्या दिवशी पाकिस्तानचे गाणे वाजवून केला होता आनंद साजरा

आठ जणांना पोलिसांकडून अटक





नासरीगंज : बिहारमधील नासरीगंज येथे ईदच्या दिवशी पाकिस्तानचे गाणे वाजवल्यामुळे बिहार पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. यामध्ये गाण्याचे बोल हे अत्यंत वादग्रस्त असून यामुळे एकप्रकारे भारताचा आणि भारतीय समुदायाचा अपमान झाल्याची भावना काही जणांनी व्यक्त केली होती. यानंतर पोलिसांनी ही कारवाई करत या सर्वाना अटक केली आहे. तसेच या घटनेचा वायरल झालेला व्हिडिओ अधिक तपासासाठी म्हणून पाठवण्यात आला आहे.

गेल्या शनिवारी रमजान ईदच्या दिवशी ही घटना घडली होती. नासरीगंज येथील मुस्लीम नागरिक ईदनिमित्त याठिकाणी मोठमोठाले साउंड लावून आला गाण्यांवर नाचत होते. यामध्ये मुस्लीम तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. यावेळी अचानक एका तरुणाने 'हम पाकिस्तानी मुजाहिदीन है' असे एक वादग्रस्त गाणे यावर लावले. यावर त्याठिकाणी असलेले मुस्लीम तरुण देखील उत्साहाने नाचत होते. परंतु या गाण्यातील वादग्रस्त शब्दांमुळे त्याठिकाणी उपस्थित असलेल्या एका तरुणाने याचा एक व्हिडीओ बनवून तो सोशल मिडीयावर शेअर केला. यानंतर सोशल मिडीयावरून यावर आलेल्या प्रतिक्रियेनंतर पोलिसांनी याविरोधात कारवाई केली.

घटनेचा व्हिडीओ :



 

 
@@AUTHORINFO_V1@@