जपानमध्ये ६.१ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके, तीन नागरिकांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
ओसाका : जपानमधील ओसाका प्रांतात आज सकाळी ६.१ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके बसले आहे. या भूकंपामुळे ओसाका प्रांतातातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपामुळे रेल्वे सेवा आणि विमानसेवा देखील विस्कळीत झाली आहे. रेल्वेच्या रुळांना आणि विमानतळाजवळील जमिनीला या भूकंपामुळे नुकसान झाले आहे. 
 
 
 
या भूकंपात २१४ नागरिक जखमी देखील झाले आहेत. जखमी नागरिकांवर सध्या उपचार केले जात आहेत. बऱ्याच ठिकाणी इमारती पडल्याने रस्त्यांचे आणि इमारतींचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या भूकंपाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जपानमध्ये नेहमी भूकंपाचे धक्के बसत असतात मात्र आजचा भूकंप हा अतितीव्रतेचा होता असे म्हटले जात आहे. 
 
 
या भूकंपामुळे ८२ विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत. विमानतळाला कुठलेही नुकसान झालेले नाही मात्र काही महत्वाचे रस्ते आणि मार्ग बंद करण्यात आले आहेत. रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या असल्याने या ठिकाणी पोलीस यंत्रणा आणि बचाव यंत्रणा कार्यरत करण्यात आल्या आहेत. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@