जोशींच्या तीन पिढ्यांसोबत स्वप्निल करतोय 'फादर्स डे' साजरा
महा एमटीबी   17-Jun-2018आज जागतिक पितृ दिन म्हणजेच फादर्स डे आहे. आणि सगळेच हा खास दिवस आपापल्या वडिलांसोबत साजरा करतायेत. या प्रमाणेच सगळ्यांचा लाडका 'स्वप्निल जोशी' आज आपल्या परिवारातील तीन पिढ्यांसोबत 'फादर्स डे' साजरा करतोय. ट्विटरच्या माध्यमातून अत्यंत सुंदर असे फोटोज शेअर करत त्याने आजच्या या खास दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये स्वप्निलचे वडील, स्वप्निल आणि त्याची मुलं मायरा आणि राघव दिसतायेत.या प्रमाणेच प्रसिद्ध सिनेस्टार अक्षय कुमारने देखील आगळी वेगळी पोस्ट करत फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये त्याने त्याची कन्या नितारा आणि त्याच्यामध्ये प्राणी पाळण्यावरुन झालेला एक गमतीदार संवाद शेअर केला आहे. अतिशय निरागस असा हा फोटो आहे.पद्मावत सिनेमातून उत्तम कार्य करणारी अदिती राव हैदरी हिने देखील तिच्या दिवंगत वडिलांना आजच्या या खआस दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल हिने देखील आपल्या वडिलांसोबत आपला फोटो शेअर करत फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज सर्व सिने तारे तारका आपल्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करत त्यांच्याविषयी भावना व्यक्त करत आहेत.