कोणत्याही संकटाचा सामना करण्यास सज्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2018
Total Views |



हैदराबाद : “भारतीय हवाई दल आकस्मिकपणे उद्भवणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, हे नुकत्याच यशस्वीपणे पार पडलेल्या ‘गगनशक्ती’ कवायतींमुळे स्पष्ट झाले आहे,” अशी ग्वाही हवाई दल प्रमुख बी. एस. धानोवा यांनी आज शनिवारी येथे दिली.

 

“देशाचे हवाई दल अकस्मात उद्भवणाऱ्या संकटाचा किती प्रभावीपणे सामना करू शकते, हे आपण सर्वांनीच ‘गगनशक्ती’मधून पाहिले आहे. या कवायतींमध्ये हवाई दलाच्या अद्भुत शक्तीचे दर्शन देशाला आणि जगालाही घडले,” असे त्यांनी सांगितले. देशाच्या उत्तर, पश्चिम आणि पूर्वेकडील आघाड्यांवर या थरारक कवायती सादर करण्यात आल्या होत्या. देशाच्या सीमांची काळजी घेण्यासाठी हवाई दल पूर्णपणे सज्ज आहे, असे ते म्हणाले. हैदराबाद शहराच्या बाहेरील दुंडीगुल येथील एअर फोर्स अकादमीत आयोजित पदवीधरांच्या पासआऊट परेडला ते संबोधित करीत होते.

 

आपला देश सध्या इतर कोणासोबतही युद्ध करीत नसला, तरी आपल्याला सज्ज राहणे आवश्यक आहे. दहशतवादी हल्ले, सायबर हल्ले, घुसखोरी, नैसर्गिक संकट किंवा भारत सरकारच्या अन्य कोणत्याही सेवेसाठी आपण सदैव सज्ज राहणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

@@AUTHORINFO_V1@@