रशियाचे उत्तर कोरियाला देशदौऱ्याचे आमंत्रण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |




मॉस्को :
अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात वाढत चाललेल्या मैत्रीनंतर आता रशियाने देखील उ.कोरियाबरोबर जवळीक वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर रशियाने देखील किम जोंग उन यांना रशिया दौऱ्याचे आमंत्रण दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून नुकतीच याविषयी घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी किम जोंग उन यांना रशिया भेटीचे आमंत्रण दिले असून येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये किम यांनी मॉस्कोला भेट द्यावी, असे आवाहन पुतीन यांनी केले आहे. तसेच उत्तर कोरियाने देखील या आमंत्रणाचा स्वीकार केला असून येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये हा दौरा होण्याची शक्यता आहे.


गेल्या १२ तारखेला किम जोंग उन आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सिंगापूर येथे द्विपक्षीय चर्चा झाली होती. या चर्चेमध्ये दोन्ही नेत्यांनी परस्पर सहकार्य आणि मैत्रीचे आश्वासन दिले होते. यामुळे गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ अमेरिका-उ.कोरियामध्ये असलेले सर्व वैमनस्य दूर होऊन एका नव्या मैत्रीपर्वाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रशियाशी चांगले संबंध ठेवून होता. परंतु उत्तर कोरिया उघडपणे अमेरिकेविरोधात भूमिका घेत असल्यामुळे आणि सातत्याने करत असलेल्या अणु चाचण्यांमुळे रशियाने कधीही उघडपणे उ.कोरियाशी असलेली आपली मैत्री मान्य केली नव्हती. परंतु आता मात्र उ.कोरिया अमेरिकेच्या जवळ जात असल्याचे पाहून रशियाला साहजिकच चिंता वाटू लागलेली आहे. त्यामुळे रशियाने हे आमंत्रण पाठवलेले आहे.
@@AUTHORINFO_V1@@