१ डाव २६२ धावांनी अफगाणिस्तानवर भारताचा विजय
महा एमटीबी   15-Jun-2018
 
 
 
 
 
बंगळुरु : कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या भारताने अफगाणिस्तानवर आज १ डाव २६२ धावांनी विजय मिळवला आहे. अवघ्या दोन दिवसांत या सामन्याचा निकाल लागल्यामुळे हा विजय भारताचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. पहिल्या डावात सलामीवीर शिखर धवन आणि मुरली विजय यांच्या शतकाच्या जोरावर भारताने ४७४ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे आयसीसीकडून कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळालेल्या अफगाणिस्तानच्या संघाची, कसोटी क्रिकेटमधली सुरुवात फारशी चांगली झालेली नाही आहे. 
 
 
 
 
पहिल्या डावात भारताकडून रविचंद्रन आश्विनने ४ इशांत शर्मा आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी २-२ बळी घेतले. पहिल्या डावानंतर भारताने अफगाणिस्तानच्या संघाला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात देखील अफगाणीस्तानच्या संघाने चांगला खेळ खेळला नसल्याने अफगाणीस्तानला एक डाव न खेळताच ही हार पत्करावी लागली आहे. 
 
 
 
 
 
या सामन्यात क्रिकेटपटू मुरली विजय याने काल दमदार शतक ठोकले आहे. बंगळूरूमधील चिनाम्मास्वामी मैदानावर हा सामना सुरु होता. काल या सामन्यात मुरली विजय याने १०५ धावांचा आकडा पार केला. या सामन्यात मुरली विजयने याने आपल्या उत्तम खेळाने प्रेक्षकांचे मन जिंकले.