फीफा विश्वचषकातील दुसऱ्या दिवशी होणार तीन सामने
महा एमटीबी   15-Jun-2018
 
 
 
रशिया : रशिया  येथे सुरु असलेल्या फीफा विश्वचषक स्पर्धेत आज तीन सामने खेळले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात 'अ' समूहात उरुग्वे आणि इजिप्ट यांच्यात लढत होईल. इजिप्टचा संघ तब्बल २८ वर्षांनंतर फीफा मध्ये खेळणार आहे, त्यामुळे हा सामना महत्वाचा ठरेल. मात्र दुखापत झाल्यामुळे संघातील प्रमुख खेळाडू मोहम्मद सालाह याच्या खेळण्याविषयी अजूनही खात्री नाहीये.
 
 
 
 
दुसऱ्या सामना रात्री ८.३० वाजता होणार असून यामध्ये 'ब' समूहातून २ संघ मोरक्को आणि ईरान यांची लढत असणार आहे. मोरक्को दोखील तब्बल २० वर्षांनंतर फीफामध्ये सहभागी होत असल्यांने सगळ्यांच्या नजरा या खेळाकडे लागल्या आहेत. तसेच ईरान सद्ध परिस्थितीतल सगळ्यात दमदार संघ मानला जात आहे.
 
तीसरा सामना रात्री ११.३० वाजता सुरु होणार असून यामध्ये स्पेन आणि पोर्तुगाल यांच्यात लढत होणार आहे. आजच्या दिवसातला हा सगळ्यात महत्वाचा आणि औत्सुक्याचा सामना मानला जात आहे कारण यामध्ये प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डो खेळणार आहे. त्यामुळे आजच्या या तीनही सामन्यांमध्ये काय होते हे बघणे आता खूप औत्सुक्याचे आणि महत्वाचे ठरणार आहे.