सलमान आणि शाहरुखला भासतेय एकमेकांची गरज ?
महा एमटीबी   14-Jun-2018
 
 
 
मुंबई :  सिनेसृष्टीतील दोन दिग्गज नावे म्हणजे शाहरुख खान आणि सलमान खान. नेहमीच ही दोन नावे चर्चेत राहिली आहेत. करन-अर्जुन सारख्या चित्रपटानंतर एकत्र एखादा चित्रपट जरी केला नसला तरी त्यांच्या मधील भांडण मात्र संपूर्ण देशात गाजलं, त्यामुळे आता या भांडणाच्या काही वर्षांनंतर एकमेकांच्या चित्रपटांचे प्रमोशन करताना ते दिसतायेत, त्यावेळी प्रेक्षकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत. आज शाहरुख खानच्या 'झीरो' या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये सलमान खान सर्वांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसून येत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा या प्रश्नाला वाचा फुटली आहे.
 
 
 
 
या चित्रपटात शाहरुख खान एका वेगळ्या भूमिकेत दिसून येत आहे. तसेच या टीझरमध्ये सलमान खान शाहरुखला कडेवर घेऊन नृत्य करताना दिसून येत आहे. याआधी देखील सलमानने शाहरुखच्या आणि शाहरुखने सलमानच्या चित्रपटांची प्रसिद्धी आपापल्या सोशल मीडियावरुन केली होती. मात्र अचानक बॉलिबुडच्या भाईजान आणि बादशाहला एकमेकांची गरज का भासावी असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
 
याआधी आलेला सलमानचा 'ट्यूबलाईट', आणि शाहरुखचा 'फॅन' बॉक्ट ऑफिसवर काही खास कमाल करु शकले नाहीत. शाहरुखचे गेले ३-४ चित्रपट सूपरहिटच्या यादीत गेले नाहीत, तसेच सलमानचे देखील झाले आहे. सलमानच्या ट्यूबलाइट या चित्रपटात शाहरुख खानने पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती, तसेच कदाचित झीरो मध्ये सलमानने केले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता हे दोघेही एकमेकांच्या नावाच्या आधारे आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी तर करत नाही ना? असा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.