बंगळूरू कसोटी सामना : मुरली विजयचे दमदार शतक
महा एमटीबी   14-Jun-2018
 
 
 
 
 
बंगळूरू : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्याला आज बेंगळूरू येथे सुरुवात झाली असून या सामन्यात क्रिकेटपटू मुरली विजयने दमदार शतक ठोकले आहे. बंगळूरूमधील चिनाम्मास्वामी मैदानावर आहा सामना सध्या सुरु आहे. या सामन्यात मुरली विजय याने १०५ धावांचा आकडा पार केला आहे. आज या सामन्यात मुरली विजयने याने आपल्या उत्तम खेळाने प्रेक्षकांचे मन जिंकले. 
 
 
 
 
 
 
 
मुरली विजय आणि क्रिकेटपटू शिखर धवन यांनी प्रथम मैदानावर खेळाला सुरुवात केली. यांच्या जोडीने मैदानावर धावांचा पाऊस बरसला. मात्र काही काळाने खऱ्या पावसाने या खेळामध्ये व्यत्यय आणले. त्यामुळे काही तासांसाठी हा खेळ थांबवण्यात आला होता. मात्र आता या खेळाला पुन्हा सुरुवात झाली असून भारत अश्या २९० धावांवर ३ बाद परिस्थितीत खेळत आहे. 
 
 
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात हा एकमेव कसोटी सामना घेतला जाणार आहे. अफगाणिस्तान संघाचा हा भारताविरोधातील पहिलाच कसोटी सामना असल्यामुळे अनेकांसाठी हा सामना म्हणजे एक विशेष पर्वणी ठरणार आहे. भारताविरोधातील या पहिल्याच सामन्यासाठी अनेकांनी अफगाणिस्तान संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.