उत्तर प्रदेश येथे भरधाव बसला अपघात, १७ लोक ठार
महा एमटीबी   13-Jun-2018

 
 
मैनपुरी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथे टूरिस्ट बस पलटून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत १७ प्रवासी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही बस जयपूरवरुन गुरसहायगंजला जात होती. या अपघातात ३५ पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
 
ही बस डिवायडरला धडकली. ज्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. बसमधील इतर प्रवाशांना दुसऱ्या बसमधून गुरसहायगंजला पाठवण्यात आले आहे.
 
जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली. अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.