ज्यांनी त्रास दिला त्यांना उघडे पाडणार : आ. एकनाथराव खडसे
महा एमटीबी   13-Jun-2018


भुसावळ, १३ जून :
ज्यांनी मला त्रास दिला, ज्यांनी मला बदनाम केले अशा लोकांना उघडे पाडणार असल्याचे माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी पत्रपरिषदेत सांगितले. अंजली दमानिया यांच्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार मुक्ताईनगर येथे गुन्हा दाखल केल्यानंतर ते भुसावळ येथे पत्रकारांशी बोलत होते.
 
 
याप्रसंगी खडसे म्हणाले की, ज्यांनी मला त्रास दिला, बदनाम केले त्यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. २ वर्षे झाली माझा अपमान झाला आहे. कायदेशीररित्या त्यांना सोडणार नसून कायद्याच्या मार्गाने संघर्ष करणार आहे. मी मंत्रीपदाचा राजीनामा देईपर्यंत मला बदनाम करण्याचे षड्यंत्र करण्यात आले माझा कोणताही दोष नसतांना त्रास झाला. ४० वर्षाच्या राजकारणात कधीही असे आरोप झाले नाही. एसिबीमार्फत माझी व कुटुंबाची तीन वेळा चौकशी झाली. त्यात काहीही आढळले नाही. शेती पलीकडे माझे उत्पन्न नाही. ज्यांनी मला बदनाम केले केले त्यांना उघडे पाडणारच आहे. त्यासाठी स्वतः चौकशी करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.