स्वाती बोरा हिला बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक
महा एमटीबी   13-Jun-2018
 
 
 
 
 
रशिया : भारताची महिला मुष्टियोद्धा स्वाती बोरा हिने रशियामध्ये सुरु असलेल्या उमाखानोव मेमोरियल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे. महिलांच्या ७५ किलो वजनी गटात स्वाती बोरा हिने हे सुवर्ण पदक भारताला मिळवून दिले आहे. अंतिम सामन्यात स्वाती बोरा हिने रशियाच्या एना अन-फिनो-जेनोवा हिच्यावर मात करत या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. 
 
 
 
स्वातीने पहिल्यांदाच आक्रमक खेळ करत जेनोवा हिच्यावर आपला दबदबा निर्माण केला. या दबदब्याने जेनोवा हिने शेवटापर्यंत स्वत:चा बचाव करत खेळ खेळला यामुळे स्वाती हिने आक्रमक खेळी करत या स्पर्धेची अंतिम फेरी आपल्या खिशात घालून घेतली. जेनोवा हिने स्वाती हिला खेळत मागे टाकण्याचा बराच प्रयत्न केला मात्र या प्रयत्नात ती अपयशी ठरली शेवटी जेनोवाचे गुण आणि आत्मविश्वास दोन्ही कमी होत गेले आणि याचाच फायदा स्वातीने घेतला.