पत्नीला भारतात सोडून विदेशात जाणाऱ्या पतींचे व्हिसा आता रद्द होणार
महा एमटीबी   13-Jun-2018
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : नवीन लग्न झाल्यावर आपल्या पत्नीला भारतात सोडून पती परदेशात कामाच्या निमित्ताने जातात अशा पतींचे आता व्हिसा सरकार रद्द करणार आहे अशी बातमी सध्या मिळत आहे. त्यामुळे आता लग्न झाल्यावर पत्नीला देखील परदेशात न्यावे लागणार आहे. जे पती अनिवासी भारतीय अर्थात ‘एनआरआय’ म्हणून ओळखले जातात त्यांच्यासाठी ही बातमी जरा दुख: देणारी ठरणार आहे. 
 
 

                              
 
 
 
पंजाब, हरियाणा आणि चंडीगड या राज्यातील नुकतेच लग्न झालेल्या पतींचे व्हिजा रद्द करण्याची प्रक्रिया ‘रिजनल पासपोर्ट’ कार्यालयाकडून सुरु करण्यात आली आहे. लग्न झाल्यावर पती आपल्या पत्नीला सोडून परदेशात कामानिमित्त जातो मात्र तो कधी परत येतो याचा अंदाज पत्नीला नसल्याने आता पत्नी आपल्या पतीचा व्हिजा रद्द करू शकते. यासाठी सरकारने एक मदत क्रमांक देखील दिला आहे. 
 
 
 
पंजाब आणि हरियाणामधील १३ हजार पतींचे आजपर्यंत व्हिजा रद्द करण्यात आले आहे. अनेक पत्नी यामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी सरकारने आणि पासपोर्ट सेवा केंद्राने हा उपाय योजला आहे. यामुळे पत्नीला सोबत न्यावे लागेल अथवा तिला कामाच्या स्वरुपाची संपूर्ण माहिती द्यावी लागेल असे यात म्हटले आहे.