खडकीतील उद्योगांच्या दुर्गंधीचा बंदोबस्त करा
महा एमटीबी   13-Jun-2018

संभाजी सेना, लोकनेते पप्पुदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठानतर्फे निवेदन

प्रशासन हलले, कंपनीच्या अधिकारी तहसीलदार यांच्याकडे मांडतील आपली भूमिका
खडकीसह हिरापूर रस्त्यावरील हजारो जनतेचे आरोग्य धोक्यात
 
चाळीसगाव :
तालुक्यातील खडकी बायपास रस्त्यालगत नवीन औद्योगिक वसाहत निर्माण झाली यात भारत वायर रोप व गुजरात अंबुजा मका स्टार्च फॅक्टरी यांचा समावेश होता. मात्र दीड दोन महिन्यांपूर्वी गुजरात अंबुजा कंपनीने मका प्रक्रिया उद्योग सुरू केला. त्यामुळे उग्र स्वरूपाचा घाणेरडा दुर्गंधीयुक्त वासाने आधी खडकी ग्रामस्थ हैराण होते मात्र गेल्या पंधरवाड्यात ही दुर्गंधीची तिव्रता बीजगुणन परिसरात आहे. या विरोधात संतापाची लाट उसळली असून मंगळवारी संभाजी सेना व लोकनेते स्व पप्पू गुंजाळ प्रतिष्टानच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. प्रशासनाने लागलीच दखल घेत कंपनीच्या अधिकार्‍यांना आपली भूमिका मांडण्याची संधी दिली आहे लवकरात लवकर हा उग्र वास बंद करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
 
 
जिवघेण्या वासामुळे खडकी, बिलाखेड, सोबतच हिरापुर रोड, मालेगाव रोड ते विमानतळ परिसरासह शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पसरला आहे. या वासामुळे परिसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.
 
 
निवेदनावर राहुल पाटील, सचिन फुलवारी, अमोल चौधरी, रवि चौधरी, आप्पा पाटील, शुभम मांडोळे, संदेश राठोड, मनिष सैंदाने, ज्ञानेश्वर ठाकरे, बारकु जाधव, रोशन चव्हाण, हेमंत गुंजाळ, पवन सैंदाने, उन्मेश राजपूत, नानासाहेब शिंदे, नरेश मांडोळे, विनोद कसबे, चेतन बागुल, विनोद बागुल, अमोल मोरे, प्रशांत पाटील, राहुल गायकवाड, संजय पाटील, विनोद चव्हाण, चेतन कुमावत, प्रतिक पाटील आदी पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
 
अधिकार्‍यांना बोलाविले
निवेदनाची लागलीच दखल प्रशासनाने घेतली असून कंपनीच्या संबंधित अधिकार्‍यांना याबाबत म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. त्याअनुषंगाने बुधवारी त्याचे अधिकारी तहसीलदार कार्यलयात म्हणणे मांडतील. त्यांनी काय उपाययोजना केल्या आहेत याचीही माहिती घेतली जाईल त्यानंतरच याविषयी पुढील भूमिका प्रशासन घेईल, अशी माहिती चाळीसगावचे तहसीलदार कैलास देवरे यांनी दिली आहे.