बहुप्रतीक्षित ट्रम्प-किम भेटीला सुरुवात
महा एमटीबी   12-Jun-2018सिंगापूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांच्यातील बहुप्रतीक्षित बैठकीला आज सिंगापूर येथे प्रारंभ झाला आहे. सिंगापूरमधील सेंटोसा हॉटेलमध्ये ही बैठक पार पडत असून दोन्ही नेते आपापल्या शिष्टमंडळासह दाखल झाले आहेत. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत सौदर्यपूर्ण वातावरणात ही बैठक पार पडत असून संपूर्ण जगाचे लक्ष सध्या या बैठकीकडे लागले आहे.

नियोजित वेळेप्रमाणे आज सकाळी या बैठकीला सुरुवात झाली. ठरलेल्या वेळेनुसार दोन्ही नेते सेंटोसा हॉटेलमध्ये आपले शिष्टमंडळासह दाखल झाले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी अत्यंत उत्साहाने एकमेकांचे स्वागत केले. तसेच आस्थेने विचारपूस केली. यानंतर काही काळ अनौपचारिक चर्चा झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या शिष्टमंडळासह द्विपक्षीय चर्चा सुरुवात झाली 

 

'किम जोन उन यांना भेटून आपल्याला अत्यंत आनंद होत असून उत्तर कोरियाच्या पुढाकाराने पार पडलेली ही बैठक पूर्णपणे यशस्वी झाली आहे' अशी प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली. तर किम जोंग उन याने देखील ही भेट आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून यापुढे उत्तर कोरिया अमेरिकेबरोबर मिळून काम करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
 
 

 
ट्रम्प-किम भेट ही गेल्या काही महिन्यांपासून जागतिक राजकारणात चर्चेचा प्रमुख विषय बनली होती. गेल्या अनेक वर्षांच्या वैमनस्याचा त्याग करून किम जोंग उन याने अमेरिकेशी चर्चेसाठी पुढाकार घेतला. विशेष दोन्ही देशांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ही घटना घडत असल्यामुळे दोन्ही देशांसाठी हा अत्यंत ऐतिहासिक असाच क्षण मानला जात आहे. तसेच या चर्चेमधून जगाच्या हिताच्याच गोष्टी बाहेर याव्यात, अशी अपेक्षा सर्व जण व्यक्त करता आहेत.