पेट्रोल डीझेलच्या किंमतींचे खापर राज्यांच्या डोक्यावर का? : पी. चिदंबरम
महा एमटीबी   11-Jun-2018

 
 
नवी दिल्ली :  पेट्रोल आणि डीझेल ला जीएसटी अंतर्गत आणल्यास त्याच्या किंमती कमी होतील. केंद्रात भाजपचे सरकार आहे, तर अधिकांश राज्यांमध्ये देखील भाजपचे सरकार आहे, असे असताना पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतीसाठी भारतीय जनता पक्ष राज्यांवर का खापर फोडत आहेत? असा सवाल काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी उपस्थित केला. आज नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
 
 
केंद्र सरकारने सामान्य माणसाची खासकरून शेतकऱ्यांची दैना केली आहे, असेही ते यावेळी म्हणाले. शेतकरी या सरकारच्या धोरणांना त्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे किमान समर्थन मूल्य म्हणजेच एमएसपी मिळत नाहीये, त्यामुळे हा शेतकरी आता रस्त्यावर उतरला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
 
 
 
रिझर्व बँकेच्या कंझ्युमर कॉन्फिडन्स सर्वेक्षणात असे आढळून आले की, गेल्या १२ महिन्यांत देशातील आर्थिक परिस्थिती बिघडली आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
२०१९च्या निवडणुका बघता आता सर्वच पक्ष सक्रीय झाले आहेत. अनेक अहवाल, अनेक सर्वेक्षणे अनेक मुद्दे समोर येत आहेत. सर्वच पक्ष एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहेत. त्यामुळे आता पुढे काय होते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.