ताजमहाल प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयाने ‘एएसआय’ला फटकारले
महा एमटीबी   09-May-2018
 

 
 
 
 
नवी दिल्ली : देशातील सगळ्यात सुंदर स्मारक म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल याच्यावर पिवळा धुळीचा थर दिवसेंदिवस वाढत असून यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग अर्थात ‘एएसआय’ काय प्रयत्न करीत आहे असा थेट सवाल आज सर्वोच्च न्यायालयाने ‘एएसआय’ केला असून ‘धुळीचे कण काय उडत येतात आणि ताजमहालवर बसतात? असा खोचक प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने ‘एएसआय’ला केला आहे. 
 
 
 
प्रदूषण वाढले असून त्यामुळे ताजमहालवर त्याचा दुष्परिणाम होत असल्याचे मत ‘एएसआय’ स्पष्ट केले असता सर्वोच्च न्यायालयाने ‘एएसआय’लाच आज चांगले सुनावले आहे. जर प्रदूषण वाढले आहे तर तुम्ही इतके दिवस काय केले. २२ वर्षांपूर्वी १९९६ मध्ये ताजमहालकडे लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले होते आणि अजून या आदेशांची अमलबजावणी करण्यात आलेली नाही त्यामुळे इतके दिवस काय तुम्ही झोपले होते असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने ‘एएसआय’ला केला आहे. 
 
 
 
 
ताजमहालचे संगमरवर दिवसेंदिवस काळे आणि पिवळे पडत चालले आहे. प्रदुषणाचा ताजमहालवर खूप वाईट परिणाम होत आहे. ताजमहाल ही जगातील सगळ्यात जुनी आणि प्रसिद्ध वास्तू आहे त्यामुळे या वास्तूचे सौंदर्य कमी होणे भारताच्या इतिहासाला नष्ट करण्यासारखे आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ‘एएसआय’ यावरून चांगलेच फटकारले आहे.