माधुरी म्हणते जीवनाची चिंता विसरा आणि मज्जा होवून जावू द्या...
महा एमटीबी   09-May-2018
 
 
 
 
 
धक धक गर्ल माधुरी दिक्षित म्हणते जीवनाच्या चिंता विसरा आणी धम्माल, मस्ती आणि मज्जा होवून जावू द्या. माधुरी तिच्या आगामी चित्रपटातील गाण्यात हे म्हणतांना दिसली आहे. माधुरीचा आगामी चित्रपट ‘बकेट लिस्ट’ याची उत्सुकता सध्या तिच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या चित्रपटातून माधुरी दिक्षित पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीतीत पदार्पण करीत आहे. 
 
 

 
 
 
 
 
चित्रपटाचे नुकतेच गाणे प्रदर्शित करण्यात आले असून ‘होवून जावू द्या’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात माधुरी उत्तम नृत्य करतांना दिसली आहे. माधुरीची मराठमोळी अदा आणि तिच्या हसऱ्या चेहऱ्याने या गाण्याला ‘चार चांद’ लावले आहे असे म्हणण्यास काही हरकत ठरणार नाही. बकेट लिस्ट हा माधुरीचा पहिलाच मराठी चित्रपट आहे त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना खूप मोठ्या प्रमाणात लागली आहे.