अशी सजली नवी नवरी सोनम कपूर
महा एमटीबी   08-May-2018
 
 
 
 
 
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर आज लग्नाच्या बेडीत अडकली आहे. उद्योगपती आनंद अहुजासोबत तिने आज मुंबईमध्ये ‘सात फेरे’ घेतले आहे. बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांनी या विवाह सोहळ्याला आवर्जून उपस्थिती दर्शविली आहे. बिग बी अमिताभ बच्चन पासून दिग्दर्शक कारण जोहर आणि इतर प्रसिद्ध सिनेमंडळी या लग्न समारंभात उपस्थित झाले आहेत. 
 
 
 
 
 
 
 
 
 
लग्न म्हटल्यावर नवरी आणि नवरदेव कसा दिसतो याकडे सगळ्यांचे पहिले लक्ष जाते आणि नवरी सोनम कपूर आहे म्हटल्यावर तर सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला गेली असेल. सोनमने आज लाल रंगाचा लाछा परिधान केला असून ती यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचे नुकतेच छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल होत असून चाहते त्याला खूपच पसंती देत आहेत.