जेव्हा उपग्रह परग्रहावर उतरतो...
महा एमटीबी   08-May-2018
 
 
 
 
 
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘नासा’ ने नुकताच एक व्हिडीओ आपल्या ट्वीटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अतिशय साध्या आणि सोप्या व्हिज्युअल इफेक्टमध्ये एक उपग्रह परग्रहावर कसा उतरतो याची माहिती देण्यात आली आहे. तसेच परग्रहावर उपग्रहाला उतरवायचे असेल तर त्यासाठी किती मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागते याची माहिती नासाच्या वैज्ञानिकांनी या व्हिडीओमध्ये दिली आहे. 
 
 
 
 
 
पृथ्वीवरून जेव्हा उपग्रह आकाशात प्रक्षेपित केला जातो तेव्हा तो उपग्रह पृथ्वीची कक्षा सोडून दुसऱ्या ग्रहाच्या कक्षेत प्रस्थापित केला जातो. जेव्हा उपग्रह दुसऱ्या ग्रहाच्या कक्षेत जातो तेव्हा उपग्रहाचे पॅराशूट उघडले जाते आणि हळूवार त्या ग्रहावर हा उपग्रह सोडला जातो असे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. मात्र हे सांगणे जितके सोपे आहे तितके मुळात अस्तित्वात आणणे कठीण आहे. 
 
 
 
 
थोडी जरी उपग्रहाच्या बनावटीत चूक झाली तर हा उपग्रह वेळेवर कक्षेत पोहोचणार नाही आणि आकाशात भटकत राहील. किंवा त्यापेक्षा काही वेगळे देखील होवू शकते. त्यामुळे यासाठी वैज्ञानिकांना किती काळजी घ्यावी लागते हे सांगणारा हा व्हिडिओ आहे तुम्ही नक्की पहा...