अबब ! कर्नाटकात आतापर्यंत १६५ कोटी रुपये जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018
Total Views |


बंगळूरू : कर्नाटक विधानसभेचे निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना भुलवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांकडून अनेक प्रयत्न सध्या सुरु झाले आहे. परंतु याच पार्श्वभूमीवर कर्नाटकातील आयकर विभागाकडून देखील राज्यात सर्वत्र धाडसत्र सुरु असून यामार्फत आयटी विभागाने आतापर्यंत तब्बल १६५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये रोकड, दारू आणि दागिने या स्वरूपामध्ये हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही सर्व रक्कम डोळे फिरवणारी अशीच आहे.

गेल्या महिन्याभरात आयटी विभागाने केलेल्या छापेमारीमध्ये एकूण ७६ कोटी ७० लाख ४१ हजार ५०३ रुपयांची रोक रक्कम तसेच २४ कोटी १२ लाख ९६ हजार ६८ रुपयांची दारू कर्नाटकामधून जप्त केली आहे. यातच सोने आणि चांदीच्या माध्यमातून आयकर विभागाने एकूण ४३ कोटी ७४ लाख २१ हजार ७१७ रुपयांचा मुद्देमाल आपल्या ताब्यात घेतला आहे. तसेच छोटा-मोठ्या आणखी काही छापेमारीमध्ये मिळून आतापर्यंत आयकर विभागाने एकूण १६५ कोटी २८ लाख ८२ हजार ४४५ रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल आपल्या ताब्यात घेतला आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम आयकर विभागाच्या हाती लागल्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील भ्रष्टाचार हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान या सर्व मुद्देमालाची अजून चौकशी सुरु असून याविषयी कसल्याही प्रकारची अधिकची माहिती आयकर विभागाने सादर केलेली नाही. परंतु ही सर्व रक्कम आणि दारू ही निवडणुकांमध्ये वाटण्यासाठीच वापरली जाणार होती, अशी माहिती आयकर विभागाने दिली आहे.
@@AUTHORINFO_V1@@