‘डेडपूल’चा आवाज बनला रणवीर सिंग, पहा ट्रेलर..
महा एमटीबी   08-May-2018
 
 
 
 
 
‘डेडपूल २’ चा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या हॉलीवूड चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग याने आवाज दिला असून त्याचा आवाज या चित्रपटाला चांगलाच शोभला आहे. डेडपूलमध्ये रणवीर सिंग सारख्याच अभिनेत्याचा आवाज हॉलीवूड करांना हवा होता. आणि त्यांना रणवीर सिंग गवसला मग काय रणवीर सिंग देखील या चित्रपटाला आवाज देण्यास तयार झाला. 
 
 
 
 
 
‘डेडपूल २’ या हिंदीमधील चित्रपटासाठी रणवीर सिंग याने स्वत:चा आवाज दिला असून या चित्रपटातील काही संवाद मनोरंजक असल्याने रणवीरचा आवाज देखील या चित्रपटाला साजेसा झाला आहे. ट्रेलर पाहतांना लक्षात येते की काही आवाज रणवीर सिंग याचा असून तो हुबेहूब जमला असून मनोरंजक आहे असे लक्षात येते. 
 
 
 
 
 
फॉक्स स्टार स्टुडीओ हा चित्रपट भारतात १८ मे ला प्रदर्शित करणार आहे. डेडपूलच्या व्यक्तिमत्वाशी ताळमेळ जुळल्याने रणवीरला हा संधी देण्यात आली आहे. तुम्ही देखील एकदा पहा हा ट्रेलर...