फर्जंदचा दमदार ट्रेलर आज प्रदर्शित
महा एमटीबी   08-May-2018
 
 

 
 
 
‘आपलं हत्यार उचलायचं ते राज्यांसाठी, आऊ साहेबांच्या शब्दासाठी आणि महाराष्ट्राच्या मातीसाठी’
 
 
बॉलीवूडकरांना देखील ज्या मराठी चित्रपटाच्या टीझरने वेड लावले तो मराठी चित्रपट ‘फर्जंद’ या चित्रपटाचे नुकतेच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटातील संवाद कानावार पाडताच मराठी माणसाच्या अंगावर काटे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. या ट्रेलरमधील काही महत्वाचे संवाद थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहेत. 
 
 
 
 
 
‘आपलं हत्यार उचलायचं ते राज्यांसाठी, आऊ साहेबांच्या शब्दासाठी आणि महाराष्ट्राच्या मातीसाठी’ हा संवाद ऐकल्यावर तर मराठी बाणा संचारल्याशिवाय राहत नाही. ‘रक्तात शिवाजी आहे आमच्या जिथे सांडेल तिथून हजार शिवाजी जन्माला येत्यात’ हा संवाद तर काळजाला भिडणारा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 
 
 
 
या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकर याने केली असून अभिनेता प्रकाश ओक आणि अनिकेत मोहन यांनी आपली उत्कृष्ट भूमिका सादर केली आहे. तुम्ही देखील एकदा हा ट्रेलर जरूर पहा...