अफगाणिस्तान विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ ८ मे ला जाहीर
महा एमटीबी   07-May-2018
 
 

 
 
 
नवी दिल्ली : राष्ट्रीय निवड समिती ही अफगाणिस्तानच्या विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ ८ मे रोजी जाहीर करणार अशी माहिती सध्या मिळत आहे. अफगाणिस्तान कसोटी सामना १४ ते १८ जूनपर्यंत खेळला जाणार आहे. भारतीय संघ अफगाणिस्तानच्या सामन्यासाठी लवकरच सज्ज होणार असून या सामन्यात कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
 
 
 
त्यानंतर भारतीय संघ ब्रिटेनमधील डबलीन येथे आयर्लंडच्या विरुद्ध दोन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळायला रवाना होणार आहे. आयर्लंड विरुद्ध जो सामना खेळला जाणार आहे या सामन्यासाठी देखील ८ मे रोजी भारतीय संघ जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे अजून ही नावे गुलदस्त्यात असली तरी देखील भारतीय संघापैकी कोण या दोन्ही सामन्यात खेळणार हे कळणार आहे. 
 
 
 
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ईशांत शर्मा हे सामने खेळणार नाही अशी माहिती सध्या मिळत आहे. त्यामुळे विराटचे चाहते सध्या नाराज झाले आहेत.