मंगळ शोधासाठी नासा घेणार आणखी एक झेप
महा एमटीबी   05-May-2018

'इनसाईट मार्स लँडर'चे आज करणार प्रक्षेपण
वेस्ट कोस्ट : मंगळ ग्रहाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 'नासा' ही अमेरिकन अवकाश संशोधन संस्था आज आपल्या 'इनसाईट मार्स लँडर' या आपल्या नव्या मोहिमेला सुरुवात करत आहे. इनसाईट मार्स लँडर मोहिमेअंतर्गत एका यंत्रमानवाला नासा आज मंगळ ग्रहावर पाठवणार असून याच्या मार्फत मंगळावर जमिनी आणि वातावरणाचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे.

अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार ५ मे ला सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी या 'इनसाईट मार्स लँडर'चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. अमेरिकेच्या वेस्ट कोस्ट येथून यूएलएच्या (United Launch Alliance) अॅटलास- V या यानाद्वारे याचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यामध्ये एक अत्याधुनिक यंत्रमानव नासा मंगळावर पाठवणार आहे. प्रेक्षपणानंतर येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये हा यंत्रमानव मंगळाच्या भूमीवर उतरेल. यानंतर याठिकाणी २ वर्ष राहून तो मंगळाच्या जमिनीखालील पदार्थांवर संशोधन करेल, तसेच मंगळावरील वातावरण तेथील तापमान आदींचा बाबत सर्व माहिती गोळा करून ही माहिती पृथ्वीवर पाठवणार आहे.
 


पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नासा १९६४ पासून सातत्याने नवनवीन मोहिमा अखात आहे. यातील अनेक मोहिमा या अपयशस्वी झाल्या आहेत, तर काही मोहिमा या यशस्वी झाल्या आहेत. यातील नासाने २०११ आणि २०१३ मध्ये क्युरीसिटी आणि मॅवेन या दोन मोहिमा अजून देखील सुरु आहेत.