भारतीय वायुसेनेत ‘डकोटा डीसी' ३ विमानाचा समावेश
महा एमटीबी   05-May-2018
 
 
 
 
 
 
आज भारतीय वायुसेनेत एका विमानाचा समावेश करण्यात आला आहे. ‘डकोटा डीसी' ३ असे या विमानाचे नाव आहे. ‘डकोटा डीसी' ३ विमानाला वायुसेनेच्या विंटेज फ्लाईटमध्ये सामील करण्यात आले आहे. १९४६ ते १९८८ रा वर्षांमध्ये हे विमान भारतीय वायुसेनेत कार्यरत होते. या विमानाच्या दुरुस्तीसाठी या विमानाला युनायटेड किंडम येथे नेण्यात आले होते. 
 
 
 
 
मात्र आता दुरूस्ती करून या विमानाला भारतीय वायुसेनेत सामील करण्यात आले आहे. राज्यसभेचे सदस्य राजीव चंद्र शेखर यांनी हे विमान विकत घेवून या विमानाची डागडुजी केली आणि भारतीय वायुसेनेला भेट स्वरुपात दिले. काही वर्षांपूर्वी ‘डकोटा डीसी' ३ विमान भारतीय वायुसेनेचे मुख्य दळणवळण करणारे विमान होते. आज ८ हजार किलोमीटरचा प्रवास सर करून हे विमान भारतात आणण्यात आले आहे. 
 
 
 
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे जे पहिले ‘एअर ऑपरेशन’ झाले ते या ‘डकोटा डीसी' ३ विमानाच्या मदतीने करण्यात आले होते. या विमानाला भारतात परशुराम विमान म्हणतात.