ट्वीटरकडून आदेश, त्वरित बदला आपल्या ट्वीटर अकाऊंटचे पासवर्ड
महा एमटीबी   04-May-2018
 
 
 
 
 
 
ट्वीटरने नुकतेच आपल्या युजर्सना सुरक्षिततेसंदर्भात काही महत्वाचे आदेश दिले आहे. लवकरात लवकर आपल्या ट्वीटर अकाऊंटचे पासवर्ड बदला असे आदेश ट्वीटरने आपल्या युजर्सना दिले आहेत. ट्वीटरच्या वापरात काही अडथळे ट्वीटरला जाणवल्याने ट्वीटरने हे आदेश दिले आहे. ट्वीटरच्या आंतरराष्ट्रीय लॉगमध्ये बग (व्हायरस) सापडला आहे. 
 
 
 
 
मात्र या बगमुळे युजर्सच्या डेटावर काहीही फरक पडणार नसून यामुळे ट्वीटरची सुरक्षितता बाधित होणार नाही असे ट्वीटरने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून म्हटले आहे. अंतर्गत परीक्षणात असे समजले आहे की ट्वीटरला कुठलाही धोका झालेला नाही मात्र सुरक्षेच्या दृष्टीने ट्वीटर युजर्सने आपल्या अकाऊंटचा पासवर्ड बदला असे आदेश ट्वीटरने आपल्या ३३ कोटी युजर्सना दिले आहे. 
 
 
 
 
काही दिवसांपूर्वी ट्वीटरच्या आंतरराष्ट्रीय लॉगमध्ये ट्वीटरच्या अधिकाऱ्यांना बग सापडले. त्यामुळे ट्वीटरने या समस्येला त्वरित सोडविले. यामुळे काहीही समस्या येणार नाही असा विश्वासही ट्वीटरने आपल्या युजर्सला दिला आहे. मात्र सुरक्षिततेचा विचार करता युजर्सने आपले पासवर्ड बदलावे असे आदेश ट्वीटरने दिले आहेत.