अबब ! तब्बल ६४ कलाकारांचा हा मराठी ‘आकापेला’ ऐकला का तुम्ही ?
महा एमटीबी   04-May-2018
मराठीतील प्रसिद्ध चित्रपट आणि नाट्य निर्माते अमेय विनोद खोपकर यांच्या मराठी 'आकापेला' हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या वेगाने वायरल होत आहे. तब्बल ६४ सिनेकलाकारांना सोबत घेऊन आणि कोणत्याही वाद्याविना तयार केलेल्या मराठी गाण्यांचा हा व्हिडीओ तुम्ही पाहाल तर तुम्हाला देखील तो नक्कीच आवडेल.


खोपकर यांची एव्हीके एंटरटेन्मेंट ही चित्रपट निर्मिती संस्था आता युट्युबवर देखील आली आहे. आपल्या युट्युब चॅनेलच्या पदार्पणासाठी म्हणून त्यांनी या व्हिडिओची निर्मिती केली आहे. यामध्ये वापरण्यात आलेल्या संगीत प्रकार ‘आकापेला’ असे म्हटले जाते. तसेच मराठीमध्ये हा पहिलाच प्रयत्न देखील आहे. खोपकर यांच्या या प्रयत्नाचे बीग बी अमिताभ बच्चन यांनी देखील कौतुक केले असून खोपकर यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.