जूनच्या पहिल्या आठवाड्यात गाव पातळीवर ग्राम समन्वय सभा आयोजित करणार - डॉ. पुरुषोत्तम भापकर
महा एमटीबी   31-May-2018
 
 
 
 
 
 
औरंगाबाद : ग्राम समन्वय सभा गाव पातळीवर घेऊन अकरा कलमी कार्यक्रमाचा निर्णय घ्यावा. या बैठकीस तलाठी कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांनी उपस्थित रहावे, येत्या २ ते ५  जून दरम्यान या सभा घ्याव्यात अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. पुरषोत्तम भापकर यांनी आज येथे दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात ग्रामसेवक संघटनेच्या राज्यातील सदस्यासमवेत 'ग्रामसेवकांच्या विविध मागण्या' संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी डॉ. भापकर बोलत होते.
 
 
 
ग्रामपंचायतीचे सचिव हे ग्रामसेवक आहे. ग्रामसेवक हे गावच्या विकासात महत्वपुर्ण भूमिका निभावत असल्याने गावच्या चेहरा निर्माण करण्याचे काम हे ग्रामसेवकांच आहे, आणि म्हणूनच ग्रामसेवकाच्या मार्फत समन्वय ग्रामसभा घेण्याचा महत्वपुर्ण निर्णय औरंगाबाद विभागात घेण्यात आला असल्याचे सांगून डॉ. भापकर म्हणाले की, गावात स्वच्छ भारत मिशन अंर्तगत शौचालये बांधणे त्यांचा वापर करणे, स्वच्छता मोहिम, जलयुक्त शिवार, प्लास्टीक मुक्ती आदी कामे ग्रामपंचायतीने प्राधन्याने करावयाची आहेत. मराठवाड्यात १२ लाख शौचालये बांधण्यात आली असून शौचालयाच्या वापरावर जनजागृती करणे प्रामुख्याने गावचा प्रमुख या नात्याने ग्रामसेवकावर आहे. ग्रामपंचायात जर सक्षम असेल तर विविध वैयक्तीक लाभाच्या योजना खऱ्या अर्थाने गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचतील.
 
 
 
प्रशासकीय कारणास्तव निलंबित करण्यात आलेल्या ग्रामसेवकांना येत्या पंधरा दिवसात कामावर घेण्याच्या सूचना संबंधिताना डॉ. भापकर, त्यांनी दिल्या यावेळी बैठकीत ग्रामसेवकांच्या बदल्या, अशदाई निवृत्ती योजना, कालबध्द पदोन्नती, कंत्राटी ग्रामसेवकांच्या सुरक्षा ठेव योजना, ग्रामसेवकांचे नियमित सेवेचे आदेश, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, कर्मचारी कल्याण अभियान आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस उपायुक्त पारस बोथरा, सुर्यकांत हजारे, ग्रामसेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष एकनाथराव ढाकणे, साहेबराव तांबोळी, शिवाजीराव सोनकवडे, एम.डी कदम, दुर्गा भालके आदीसह विभागाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.