विजय माल्याच्या जीवनावर येणार चित्रपट !
महा एमटीबी   29-May-2018


मुंबई : हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेल्या आरोपी विजय माल्या याच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट बनवणार असल्याची घोषणा सेन्सॉर बोर्डचे माजी अध्यक्ष आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक पहलाज निहलानी यांनी आज केली आहे. दरम्यान चित्रपटाची कथा अत्यंत विनोदी असणार असून ही पूर्णपणे माल्याच्या जीवनावरच आधारित असणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या चित्रपटाचा मुख्य नायक म्हणून गोविंदाची निवड करण्यात आली असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच या चित्रपटातील गोविंदाचा 'हा' नवा अवतार पाहून प्रेक्षक देखील चकित होतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान चित्रपटाच्या चित्रीकरणाची तारीख मात्र अद्याप त्यांनी स्पष्ट केलेली नाही.

दरम्यान निहलानी यांच्या या घोषणेनंतर सोशल मिडीयावर मात्र एकाच नव्याच चार्चेका उधाण आले आहे. गोविंद याची 'लीड हिरो' म्हणून निवड करण्यात आल्याची घोषणा निहलानी यांनी केल्यानंतर त्याचे सर्वच चाहते त्याला या नव्या रुपात पाहण्यासाठी उत्सुक झाले आहे. तर काहींच्या मते माल्यासारख्या आरोपीच्या जीवनावर चित्रपट काढणे हेच मुळात चुकीचे असल्याचे म्हणत आहेत. परंतु निहलानी यांची ही संकल्पना मात्र बऱ्याच जणांना आवडल्याचे दिसत आहे.