विद्याधनासाठी ‘तिची’ धडपड...
महा एमटीबी   29-May-2018वयाच्या 61व्या वर्षी समाजातील अनेक ज्वलंत समस्या सोडविण्याच्या कामामध्ये व्यस्त असलेल्या कुमारी शिबुलाल यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच काहीसा आहे.

आज ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणामुळे होणारी उन्नती, मुलांचे उज्ज्वल भवितव्य लक्षात घेऊन शेतकर्यांचा मुलांना शिक्षण देण्याकडे कल वाढलेला दिसतो. अर्थात, ही अभिमानास्पद बाब आहे. शिक्षणामुळे होणारे परिवर्तन ग्रामस्थांनाही पटू लागले आहे. हे असं वातावरण अलीकडच्या काळात दिसून येतं असलं तरी साधारण २५ ते ३० वर्षांपूर्वी हे चित्र काहीसं वेगळं होतं. शेती असो वा इतर कोणताही छोटा-मोठा व्यवसाय, नोकरी करणारे, ग्रामीण भारताला एकूणच शिक्षणाची तितकीशी गरज भासत नव्हती. मिळणार्या उत्पन्नातून कुटुंबाच्या प्राथमिक गरजा भागवण्याकडे अनेकांचा कल असायचा आणि अर्थात या प्राथमिक गरजांमध्ये शिक्षणाला स्थान नव्हतं. ३० वर्षांपूर्वी मुलींनी शिक्षण घेतलाचूल आणि मूलहे त्यांचं विश् असावं, अशी विचारसरणी समाजामध्ये रूजली असताना केरळमध्ये राहणारे एक मध्यमवर्गीय कुटुंब मात्र या सर्व परिस्थितीला अपवाद ठरले. मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव करता त्यांना समान न्याय, वागणूक, शिक्षण देण्यासाठी ते कुटुंब प्रयत्नशील होते त्याची सुरुवात त्यांनी आपल्या कुटुंबापासून केली होती. या अशा वातावरणामध्ये घडत गेलेल्या कुमारी शिबुलाल यांनी उच्च शिक्षण घेतले आणि त्यानंतर शिक्षणापासून वंचित अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाची वाट मोकळी करून दिली. वयाची साठी ओलांडलेल्या कुमारी शिबुलाल यांनी `सरोजिनी दामोदर फाऊंडेशनची स्थापना केली. केरळ आणि कर्नाटकमधील गुणवान विद्यार्थ्यांना 10 वीनंतरच्या शिक्षणासाठी ही संस्था शिष्यवृत्तींच्या माध्यमातून आर्थिक मदत करते. तसेचविद्याधनया उपक्रमांतर्गत आतापर्यंत हजारपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आल्या आहेत. कुमारी शिबुलाल यांचा केरळमधल्या राममंगलम या छोट्याशा खेड्यात मध्यमवर्गीय घरात जन्म झाला. शालेय शिक्षण घेण्यासाठी त्यांना त्यांच्या घरापासून काही किलोमीटर अंतर दूर जावे लागत असे. माध्यमिक आणि भौतिकशास्त्रातील महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कोचीनच्या केरळ विद्यापीठातून घेतले. वयाच्या २४व्या वर्षी त्यांचा विवाह एस.डी. शिबुलाल यांच्याशी झाला. शिबुलालइन्फोसिसच्या सात संस्थापक सदस्यांपैकी एक आणि माजी मुख्य कार्यकारी संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. मधला काही काळ सुखाचा गेल्यानंतर या दाम्पत्याच्या आयुष्यात एक कठीण काळ आला होता. त्यांची कंपनी आर्थिक संकटात सापडल्याने कंपनीच्या कामकाजावर त्याचा परिणाम झाला. काही झालं तरी अनेक कर्मचार्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी कर्मचार्यांचं वेतन देण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. काही काळानंतर त्यांची कंपनी स्थिरावली. त्यानंतर त्यांचा भारत-अमेरिका असा दौरा सुरू असायचा. याच दरम्यान त्यांच्या मुलीचा भारतात आणि मुलाचा अमेरिकेत जन्म झाला. आर्थिकदृष्ट्या स्थिरावल्यावर त्यांनी शिक्षणावर भर देण्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कुमारी यांनी स्वत: प्रवास करून दरवर्षी शिष्यवृत्तीसाठी मुलांच्या मुलाखती घेण्यास सुरूवात केली. सुरुवातीला त्यांनी फक्त दोन मुलांना शिष्यवृत्ती देण्यापासून सुरुवात केली. पण, त्यानंतर दरवर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक मदतीस येऊ लागले. पण, यामध्ये शिक्षणाच्या नावाखाली केवळ पैशासाठी शिष्यवृत्ती घेणारे लोकदेखील त्यांना भेटले. मग त्यांनी यावर तोडगा काढून शिष्यवृत्तीसाठी गरजू मुलांसाठी निवड प्रक्रिया सुरू केली. केरळमध्ये एस. डी. फाऊंडेशनच्या अंतर्गत २०६२ शिष्यवृत्त्या दिल्या जातात आणि कर्नाटकमध्येविद्याधनअंतर्गत १७२ मुलांना शिष्यवृत्त्या दिल्या जातात. या शिष्यवृत्ती मिळालेले बहुतेकजण नंतर इंजिनिअर आणि डॉक्टर्स झाले आहेत. केरळमध्ये १७ डॉक्टर, १५३ इंजिनिअर, ११७पदवीधारक आहेत, तर या शैक्षणिक वर्षात केरळमध्ये ५२ डॉक्टर, १९१इंजिनिअर आणि १३८ पदवीधारक आहेत. तसेच सध्याविद्याधनअंतर्गत ९०७ विद्यार्थी आहेत. `अंकुरया उपक्रमांतर्गत अद्वैत फाऊंडेशनमध्ये जवळपास १२३ विद्यार्थ्यांना संहिता ॅकेडमीइथे निवासी शिक्षण देते. कुमारी या संस्थेच्या विश्वस्त आहेत. शाळा सुरू करावी, असे आपण कधीही ठरविले नव्हते. पण, त्यांच्या लक्षात आले की, अनेक मुलांना त्यांच्या शाळांमध्ये भेदभावाला सामोरे जावे लागते. यामुळे त्या खूप अस्वस्थ झाल्या. “या मुलांना मला माझ्या स्वत:च्या मुलांप्रमाणे वागवायचं होते, पण तसे होत नव्हते. त्यामुळेच जिथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही, अशी स्वत:ची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला,” असे कुमारी सांगतात. त्या पुढे म्हणतात की, “आयुष्याच्या प्रवासामध्ये एकबॅड पॅचयेतो. त्या काळामध्ये सगळं कठीण होऊन बसतं. आपली स्वप्नं, महत्त्वाकांक्षा पूर्ण करताना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागते. मेहनत, कष्ट आपण घेत असतो, परंतु त्याचं फळ आपल्याला लगेच मिळत नाही. पण, काही काळ लोटल्यानंतर तुमच्या आयुष्यातील हाबॅड पॅचनिघून जातो. त्यातून आपण मानसिकरित्या खंबीर होतो. या वाईट काळामध्ये आपल्या मदतीसाठी कोणीतरी धावून येतं, आपल्याला आधार देतो, तसाच आधार आपण इतरांना द्यावा, शिक्षणाच्या अभावामुळे कोणाची स्वप्नं अधुरी राहू नये, केवळ या भावनेतून आपण इतरांना शिक्षणाची दिशा दाखवून देण्याचं कार्य करण्याचा निर्णय घेतला.” त्याचबरोबर महिला, गरोदर मातांना पोषक आहारासाठी मार्गदर्शन करणे, सेंद्रिय शेतीचे शेतकर्यांना धडे देणं, वृद्धांच्या समस्या मार्गी लावण्याच्या कामामध्ये कुमारी यांनी स्वतःला
वाहून घेतलं आहे.