हैदराबादला नमवत चेन्नई सुपर किंग्जचा दमदार विजय
महा एमटीबी   28-May-2018
 

 
 
 
मुंबई : इंडीयन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेच्या अकराव्या हंगामाचे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्ज संघाने पटकावले आहे. काल मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नई संघाने सलामीवीर शेन वॉटसनच्या नाबाद शतकाच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाचा ८ गड्यांनी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्ज याने सनरायझर्स हैदराबाद संघचा दमदार पराभव करत यावर्षीच्या आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावावर करून घेतले. 
 
 
 
 
 
 
 
 
त्यापूर्वी फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने निर्धारित २० षटकांत ६ बाद १७८ धावा केल्या, चेन्नई संघाने एकोणिसाव्या षटकांतच हे लक्ष्य साध्य केले. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जस संघ तिसऱ्यांदा विजेता ठरला आहे. कालचा सामना अतिशय रंगतदार ठरला आहे. या सामन्यातून महेंद्रसिंग धोनी आणि वॉटसन याने दाखवून दिले वय काहीही आड येत नाही खेळ आपला चांगला पाहिजे.