हवाईमधील ज्वालामुखी देतोये धोक्याची सूचना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
हवाई : अमेरिकेतील हवाई बेटावरील जगातील सगळ्यात मोठा आणि सक्रीय ज्वालामुखी किलाएवा सध्या आपला पसारा वाढवत असून आसपासच्या परिसराला धोक्याची सूचना देत आहे. हवाई बेटावरील विजेच्या संयत्राजवळ हा ज्वालामुखी पोहोचला असून यामुळे आता धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे. 
 
 
 
तसेच या ज्वालामुखीतून हानिकारक वायू आणि गॅस निघत असल्याने आसपासच्या नागरिकांनी हा भाग सोडवा लागत आहे यामुळे नागरिक दुसरीकडे स्थलांतर करत आहेत. हा ज्वालामुखी काही दिवसांपूर्वी फुटला आणि त्यामुळे ज्वालामुखी फुटल्यावर त्याचा लावारास ३० हजार फुटापेक्षा देखील उंच उडाला असून यामुळे वातावरणात उष्णता पसरली आहे. आता हा ज्वालामुखी कधी शांत होईल याकडे शात्राज्ञांचे लक्ष लागले आहे. 
 
 
 
यामुळे बेटावर असलेल्या जंगलाच फार मोठा भाग नष्ट झाला आहे. त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या धुरामुळे वातावरण आणखीनच प्रदूषित होत आहे. याचबरोबर वन्यजीवांची देखील हानी होत आहे. पर्यावरणाबरोबर बेटावरील स्थानिक नागरिकांची देखील घरे या लाव्यामुळे नष्ट झाली आहेत. त्यामुळे अनेकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. सुरक्षा दृष्टीने बेटावरील काही महत्त्वाचे रस्ते देखील बंद करण्यात आले असून एकूण हवाईमधील पर्यटनावर या ज्वालामुखीय स्फोटाचा अत्यंत वाईट परिणाम पडला आहे.
@@AUTHORINFO_V1@@